फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
देश विदेश

खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये भरघोस वाढ!

खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये भरघोस वाढ!

खासदारांचा मासिक पगार एक लाख २४ हजार रुपये
नवी दिल्ली : नोकरी करत असलेल्यांना पगारवाढीचे वेध लागले आहेत. तब्बल सात वर्षांनंतर खासदारांच्या पगार आणि भत्त्यात २५ टक्के भरघोस वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. पगारवाढीची अधिसूचना जारी झाली आहे. आता खासदारांचा मासिक पगार एक लाख २४ हजार रुपये असेल.

आधी खासदारांचा मासिक पगार एक लाख रुपये होता. आता खासदारांचा मासिक पगार एक लाख २४ हजार रुपये असेल. खासदारांचा दैनिक भत्ता सध्या दोन हजार रुपये आहे जो वाढीनंतर अडीच हजार रुपये होणार आहे. खासदारांचे निवृत्ती वेतन आधी दरमहा २५ हजार रुपये होते, आता ते दरमहा ३१ हजार रुपये असेल. जर खासदार म्हणून पाच वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले असेल तर आधीच्या कार्यकाळातील प्रत्येक वर्षासाठी आधी दरमहा दोन हजार रुपये निवृत्ती वेतन होते ते आता दरमहा अडीच रुपये एवढे मिळेल.

महागाई दरात वाढ झाल्यामुळे वेतन आणि भत्ते वाढविण्यात आले आहेत. खासदारांना ७० हजार रुपये मतदारसंघ भत्ता देखील मिळतो. २०१८ च्या दुरुस्तीनुसार, हे पैसे खासदारांना मतदारसंघातील जनसंपर्क खर्च म्हणून दिले जातात. याशिवाय, त्यांना दरमहा कार्यालयीन भत्ता म्हणून ६०,००० रुपये आणि संसदीय अधिवेशनादरम्यान दैनिक भत्ता म्हणून २००० रुपये मिळतात. हे भत्तेही आता वाढवले ​​जातील.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"