फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

महिलांच्या सुरक्षेसाठी कष्ट घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलजी साळुंखे यांचा सन्मान!

महिलांच्या सुरक्षेसाठी कष्ट घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलजी साळुंखे यांचा सन्मान!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेल
 पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा सौ मनीषाताई गटकळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत,चिखली पोलीस स्टेशनचे सिंघम आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अविरत कष्ट घेणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलजी साळुंखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेशजी बहल साहेब तसेच माजी शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

viara vcc
viara vcc

तसेच मा.महापौर सौ मंगलाताई कदम,मा.नगरसेवक शामअण्णा लांडे,मा.नगरसेवक जितेंद्रजी ननावरे,यांचे हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले .

सन्मानार्थी :- 1)अतुल काळोखे–थरमॅक्स युनियन प्रतिनिधी , 2)सुमित कोंढे–थरमॅक्स युनियन प्रतिनिधी, 3)सुनील गाडे–मर्सिडीज बेंज युनियन लीडर, 4)अर्चना बोरसुने–अध्यात्म आणि समाजिक कार्य, 5)डॉ रामश्याम अग्रवाल–वैदयकीय, कोविड योद्धा, 6)दीपमाला नंदकुमार लोहकरे–(हवालदार)महिला सुरक्षावर विशेष योगदान, इत्यादी मान्यवरांचे सन्मान करण्यात आले..तसेच कृष्णा वाघ आणि मयुरेश वाघ निर्मित स्वरधार हा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला..

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली,तसेच विशेष कार्यकारी अधिकारी शिवानंदजी चौगुले साहेब,यशवंत कण्हेर काका,सुनीलजी गाडे,निर्भया नारी मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चे विशेष योगदान कार्यक्रमास लाभले..कुशाग्रदादा कदम,मारुती जाधव,अनिकेत बाबर, अक्षय इंगळे, अरुण चव्हाण, प्रशांत डमढेरे,युवराज बिराजदार,स्वप्नील शेंडगे,प्रदीप सपकाळ,सचिनदादा सानप,युवराज कोकाटे,युवराज पवार, सरिताताई नेवाळे,जनाबाई गोरे,यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष कविताताई खराडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेधाताई पळशीकर,आशाताई मराठे,ज्योतीताई गोफने,निर्मलाताई माने,संगीताताई कोकणे,उज्वलाताई ढोरे,शीतलताई दुर्वे,अर्चना बोरसुने,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री जयंत किसन गटकळ व डॉ तन्मय बळीराम गटकळ यांनी केले तसेच आभार श्री बळीराम कल्याणराव गटकळ यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"