चौंडी गावी ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाची बैठक!

अहिल्यानगर : आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या गावी झालेल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे 11 निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळाने आज विविध विकास कामांना मान्यता दिली .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
1) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनातर्फे निर्मिती करणार.
2) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार ,आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार ,महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार .अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे ,मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, बाल विवाह ,मुक्त समाज निर्मिती ,,लैंगिक शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करून हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाज निर्मिती अनिष्ट रूढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देणार.
3) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात येणार .यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबवली जाणार .दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण दिले जाणार. आतापर्यंत यासाठी 288 कोटी 92 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत
4) धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वस्तीगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह योजना असे नाव देण्यात येईल. प्रत्येकी 200 क्षमतेची ही वस्तीग्रह असणार आहेत .यात मुलांसाठी 100 तर मुलींसाठी शंभर क्षमतेचे वस्तीग्रह असेल. नवी मुंबई, पुणे ,छत्रपती संभाजीनगर ,नाशिक, नागपूर ,अमरावती येथे वस्तीगृह असतील .
5) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी ,पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे. यासाठी 75 कोटी रुपये खर्च केला जाईल .
6) अहिल्यानगर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 घाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येईल. या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे असेल. यासाठी 485 कोटी आठ लाख खर्च करणार आहे.

7) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे अवचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्नमानाच्या कामाला अभिवादन म्हणून 55 हजार 3 कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत .चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचे जतन आणि संवर्धन केले जाईल .त्यासाठी 681 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .याशिवाय अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्वार 147 कोटी 81 लाख, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा 1865 कोटी, श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 269 कोटी 59 लाख ,श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी ,श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा1445 कोटी 97 लाख, श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखडा 829 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
8) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरू करणार.
9) राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय 10 ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी 2022- 25 ऐवजी 2018 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक त्रिंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश 2025 जारी करण्याचा निर्णय.