आळंदी शहरात जड व अवजड वाहनांना नगरपरिषद निवडणुकीमुळे बंदी!

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक शाखेचे आवाहन
पिंपरी : आळंदी नगर परिषदेची निवडणूक मंगळवार दोन डिसेंबर रोजी होणार असल्याने शहरात होऊ नये यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाने आळंदी शहरांमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे .

आळंदी शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील जड व अवजड वाहनांना बंदी असणार आहे. नगरपरिषदेची निवडणूक सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत होणार आहे. मतदानासाठी शहरातील शाळा आणि संस्थेच्या इमारतीमध्ये मतदान केंद्रे आहेत. मतदानाच्या दिवशी मतदारांची व उमेदवारांच्या प्रतिनिधींची होणारी गर्दी आणि निवडणूक साहित्यसाठी ने आण करण्यासाठी व इतर जड वाहने यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
मरकळ वरून आळंदीत येणाऱ्या वाहनांना पीसीएम चौक मार्गे वडगाव घेणं व चाकण पुणे बाजूकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे या प्रतिबंधामुळे ही वाहने के के हॉस्पिटल गल्ली ते अन्नपूर्णा माता नगर जिओ शोरूम चाळीस फुटी रोड हिताची एटीएम मार्गे पर्यायी मार्गाने इच्छित स्थळी जातील पीसीएम पीसीएस चौकाकडून येणारी वाहने दाभाडे सरकार चौक बायपास चरोली फाटा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील .
वडगाव घेनंद बाजूकडून वडगाव रोड ने आळंदी मार्गे पुणे व चाकण बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध केला आहे. सदर मार्गावरील वाहने 40 फुटी मार्गे जोग महाराज धर्मशाळा चाकण रोडने इच्छित स्थळी जातील.
देहू फाटा ते आळंदी येथे येण्यास- जाण्यास सर्व प्रकारच्या जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. पुणे कडून येणारी वाहने देहू फाटा चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
भारत माता चौकाकडून येणारी वाहने देहू फाटा चौक उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
चाकण बाजू कडून येणाऱ्या व इंद्रायणी हॉस्पिटल मार्गे आळंदी कडे जाण्यास सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी असेल. चिंबळी फाटा मार्गे ही वाहने इच्छित स्थळी जातील.
जड व अवजड वाहनांना मंगळवार दोन डिसेंबर रोजी पहाटे सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा मतदान प्रक्रिया समाप्त होईपर्यंत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना (अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अग्निशामक ,ॲम्बुलन्स तसेच निवडणूक प्रक्रियेतील वाहने वगळून) अन्य जड वाहनांना बंदी असेल असे वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी म्हटले आहे.

