फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
पिंपरी-चिंचवड

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांची आमदार गोरखे यांच्या कार्यालयास भेट!

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांची आमदार गोरखे यांच्या कार्यालयास भेट!

पुणे, पिंपरी चिंचवड ; महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. प्रकाश आबिटकर यांनी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार. अमित गोरखे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाली. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांवर आणि शासनाच्या पातळीवर सुरू करता येणाऱ्या उपाययोजनांवर विशेष चर्चा झाली. शहरातील प्राथमिक व विशेष आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनाचे मार्गदर्शन मंत्री मोहदयानी केले.

viara vcc
viara vcc

तसेच, लवकरच माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी वैद्यकीय कक्ष सुरू करणार असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिली. या संदर्भातील सर्व मदत मी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनामार्फत करेल असे मंत्री प्रकाश अबिटकर यांनी आश्वस्त केले

या भेटीप्रसंगी अनेक मान्यवर डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये: डॉ. प्रताप सोमवंशी, अध्यक्ष NIMA पिंपरी चिंचवड, तसेच अध्यक्ष भाजपा डॉक्टर्स सेल, पिंपरी चिंचवड Dr. रमेश केदार, Dr. सत्यजीत पाटील, डॉ . वैभव लाडे, डॉ . प्रशांत बंब, डॉ . साहेबराव सांगवीकर, डॉ . पिंजारी सर यांच्या उपस्थितीत होते. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचं शिल्प ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"