निवड चाचणीत भैरवनाथ संघाला विजेतेपद

अंतराराष्ट्रीय कबड्डीपट्टू प्रवीण नेवाळे, संदीप नेवाळे यांचा पुढाकार
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, (प्रतिनिधी ) : चिखली येथील ओम साई कबड्डी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अंतर्गत पिंपरी चिंचवड विभाग वरिष्ठ गट निवड चाचणी स्पर्धेत भोसरीच्या भैरवनाथ क्रिडा संस्थेच्या अ गटाने विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित गव्हाणे, अतिरिक्त पो.अधीक्षक तिहेरी महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी,पुणे जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, राहुल भोसले, संजय नेवाळे, शिक्षण मंडळाचे माजी उप सभापती विष्णू नेवाळे, गीताराम मोरे,साधना मळेकर, संगीता ताम्हाणे, कबड्डी असोशिएशचे सरकार्यवाह दत्ता झिंजुर्डे, कार्यवाह दत्ता कळमकर, चिखलीचे माजी सरपंच काळुराम यादव,गणपत आहेर, सदाशिव नेवाळे, पोलीस पाटील विष्णू मोरे, विकास साने,अमृत सोनवणे, नवनाथ मोरे,अविनाश मोरे, मुख्य आयोजक राष्ट्रीय कबड्डीपट्टू तथा ओम सई कबड्डी संघाचे अध्यक्ष प्रवीण नेवाळे, उपाध्यक्ष संदीप नेवाळे उपस्थित होते.
अंतिम सामान्यात भैरवनाथ संस्थेच्याच अ गट आणि ब गट यांच्यात चूरशीची लढत झाली. या दोन्ही सामान्यात आष्टापैलू खेळाडू आदित्य चौगुले याने निर्णायक अशी कामगिरी करत विजय खेचून आणला. उपांत्य फेरीत भैरवनाथ क्रीडा संस्था अ गट आणि राकेशभाऊ घुले कबड्डी संघ बोपखेल यांच्यात लढत झाली. भैरवनाथचा ब गट आणि अतुलदादा बेनके स्पोर्ट्स क्लब जुन्नर यांच्यात जोरदार सामना झाला. यावेळी भैरवनाथ संस्थेचे विशाल धावडे आणि कृष्णा शिंदे यांनी चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात सुनील सिद्धगवळी, निखिल धावडे,संचित पाटील विराज लांडगे यांची उत्तम पकड तर चढाई मध्ये संकेत लांडगे, कृष्णा लांडगे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रय तरटे यांनी तर आभार प्रवीण नेवाळे यांनी मानले.
महिला गट अंतिम विजेते संघ
१. क्रिडा कला विकास प्रकल्प (अ)
२. महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन भोसरी (अ)
३. ज्ञानप्रबोधिनी क्रिडा संस्था
४. ब्रह्मा विष्णु महेश स्पोर्टस् क्लब चिखली
पुरुष गट अंतिम विजयी संघ
१. भैरवनाथ क्रिडा संस्था भोसरी (अ)
२. भैरवनाथ क्रिडा संस्था भोसरी ( ब)
३. राकेश भाऊ घुले कबड्डी संघ बोपखेल
४. अतुल दादा बेनके स्पोर्ट क्लब जुन्नर