बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ स्मारकाचे भूमिपूजन!

प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते रविवार 4 मे रोजी
पिंपरी : संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना ज्यांनी घडवले त्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर असणे आवश्यक आहे .त्याच उद्देशाने कासारवाडी येथील महापालिकेच्या आवारात बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्यात येणार असून रविवार 4 मे रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती नगरसेवक शामराव लांडे यांनी दिली .
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि संस्कार हा एक मोठा अभ्यास आहे, याच विचारांचा पगडा तरुण विद्यार्थ्यांवर पडावा यासाठी नगरसेवक शामराव लांडे त्यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकामुळे शहराच्या लौकिकात वाढ होणार आहे .या प्रकल्पासाठी 2 कोटी 96 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे ऑक्टोबर 2024 मध्ये याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार मी पी एन नगने यांची निविदा मान्य करण्यात आली महापालिकेच्या आवारात हे स्मारक उभारले जात असून बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे त्यासोबतच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल प्रेरणा जागृत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित म्युरल उभारण्यात येणार आहे .यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर घेतलेली स्वराज्याची शपथ ,मावळ्यांना सोबत घेऊन बालवयात केलेल्या लढाया, राज्यभिषेक यांचे चित्रण केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ यांचे हे पहिले स्मारक आहे. याबरोबरच आकर्षक स्वागत कमान, संस्कार सृष्टी आणि अत्याधुनिक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन चार मे रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या प्रकल्प संकल्पनेने कासारवाडी परिसरात आकर्षक प्रकल्प उभारला जात आहे असे श्याम लांडे यांनी सांगितले.