फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
अर्थकारण

G-Pay ची नवीन फीचर्स पाहिलीत का?

G-Pay ची नवीन फीचर्स पाहिलीत का?

सध्या रोख रकमेने व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन पेमेंटच्या अनेक पद्धती वापरल्या जातात. गूगल पे अर्थात G-Pay वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गूगलनं मुंबईत पार पडलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये अनेक नवीन फिचर्स लॉन्च केली आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

गुगलनं ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये गुगल पे वापरणाऱ्यांसाठी काही नवे फिचर्स आणले आहेत. यामध्ये युपीआय सर्कल, युपीआय युटिलिटीय/ईरुपी, क्लिक पे क्यूआर स्कॅन, प्रीपेड व्हाऊचर पेमेंट्स असे अनेक चांगले फिचर्स गुगलनं लॉन्च केले आहेत. या सगळ्या फिचर्सविषयी सखोल माहिती पाहुया.

UPI Vouchers
यूपीआय व्हाउचर्स किंवा ईरुपी हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) फिचर २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. हे आता गुगल पे वर वापरता येईल. या सुविधेद्वारे लोक एक प्रिपेड व्हाउचर तयार करू शकतात जे मोबाईल नंबरशी जोडलेले असेल. यूजर्सनी बँक खाते यूपीआयशी लिंक केले नसले तरीही डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. एनपीसीआय आणि वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्यांनं हे फिचर प्लॅटफॉर्मवर आणलं आहे.

Prepaid Utility Bill
गुगल पे युजर्सला नव्या फिचर्ससह प्रिपेड युटिलिटी बिल हे नवं फिचर देखील मिळणार आहे. पेटीएममधील फिचरप्रमाणेच हे अॅप युजर्सला आपला ग्राहक डेटा अॅपमध्ये जोडल्यानंतर त्याच्या प्रीपेड युटिलिटी बिलांसाठी काम करेल.

Click Pay QR
क्लिक पे क्यूआर स्कॅन हे गुगल पेमध्ये येणाऱ्या बिल पेमेंटसाठी आणखी एक नवे फिचर आहे. अॅपमधील क्यूआर कोड स्कॅन करून गुगल पे वर त्यांचे बिल भरता येईल. जेव्हा बिलरने ग्राहकासाठी क्यूआर कोड तयार केला असेल, तेव्हा याचा वापर करता येईल. गुगलच्या म्हणण्यानुसार, एकदा स्कॅन केल्यानंतर युजर्सना बिलाची रक्कम दिसेल.

UPI circle
यूपीआय सर्कल हे एनपीसीआयमधील एक नवीन फिचर्स आहे. हे यूपीआय खातेधारकांना बँक खाते नसतानाही डिजिटल पेमेंट करता येणार आहे. ज्यांचे बँक खाते किंवा गुगल पे एकमेकांशी जोडलेले नाहीत, परंतु त्यांना यूपीआय पेमेंट करायचे असेल तरी हे वापरता येईल. यात १५,००० रुपयांपर्यंत मासिक मर्यादा मिळू शकेल. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्या सहकार्याने हे फिचर लाँच करण्यात आलं आहे.

Tap and Pay Payment
या वर्षाच्या अखेरीस गुगल पेमध्ये टॅप अँड पे विथ रुपे कार्ड देखील समाविष्ट करण्यात आलं आहे. रुपे कार्डधारक आपले रुपे कार्ड अॅपमध्ये जोडू शकतात. यानंतर स्मार्टफोन टॅप करून कोणतंही पेमेंट करता येईल. विशेष म्हणजे अॅपमध्ये कार्डची माहिती ठेवली जात नाही, असे कंपनीनं म्हटले आहे.

Auto Pay
यूपीआय लाईला ऑटो पे फीचर मिळत आहे. जेव्हा तुमच्या बँक खात्यात पैसे एका ठराविक रकमेपेक्षा कमी होईल. त्यावेळी युजर्स त्यांचे यूपीआय लाईट खाते आपोआप टॉप-अप करू शकतील.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"