फक्त मुद्द्याचं!

10th September 2025
पिंपरी-चिंचवड

‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद!

‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत मोरवाडी येथील नाना-नानी पार्क येथे आयोजित फेडरेशन लीडर्ससाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

viara vcc
viara vcc

कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी केले. यावेळी समाज विकास विभागातील समाजसेवक विशाल शेडगे, सक्षमा प्रकल्प संचालक सचिन उपाध्ये यांच्यासह उडान (प्रभाग ब), आरंभ (प्रभाग ड) आणि झेप (प्रभाग ई) या तीन फेडरेशनमधील एकूण २६ महिला लीडर्स, तसेच झोनल सोशल वर्कर्स आणि फील्ड कोऑर्डिनेटर्स सहभागी झाले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात गणपती नांगरे (क्षमता बांधणी प्रमुख) यांनी प्रशिक्षणाचा उद्देश समजावून सांगितला. फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण अंतरंगातून नेतृत्व करणे, अंतर्मनाचा आवाज स्वीकारणे, इतरांचे नेतृत्व करणे, भविष्य घडवणे, लैंगिक समतोल अर्थसंकल्प तसेच लैंगिक समानता प्रशिक्षण आदींचा प्रशिक्षणात समावेश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘अंतरंगातून नेतृत्व करणे’ या विषयावर प्रशिक्षण देताना यामध्ये माझे नेतृत्वगुण, वाचक शब्द, चांगला नेता कसा असावा?, जुन्या कल्पना मोडणे, तुमचा आवाज शोधणे, खंबीरपणे उभे राहणे या घटकांचा समावेश होता. हे सत्र परस्परसंवादी आणि कृतीआधारित पद्धतीने पार पाडण्यात आले. ज्यामध्ये सर्व महिला लीडर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन उपाध्ये यांनी तर सूत्रसंचालन निशा निमसे यांनी केले.

महिलांनी शिक्षण सुरू ठेवावे, नेतृत्वगुण विकसित करावेत, वैयक्तिक व सामाजिक विकासाकडे लक्ष द्यावे, यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरतात. या माध्यमातून महिलांना स्वत:मधील गुण वृद्धिंगत करण्यास मदत होते.- ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"