फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

मारुंजी येथील फर्निचर दुकानदाराला बेदम मारहाण!

मारुंजी येथील फर्निचर दुकानदाराला बेदम मारहाण!

पिंपरी : व्यावसायिक वादातून फर्निचर दुकानदाराला डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 23 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील कृष्णा किचन अँड इंटिरियर दुकानात घडली घडली.

viara vcc
viara vcc

मोहनलाल वरींगराम विष्णोई (वय 47, मारुंजी,मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. काळुराम विष्णोई ,अशोक कुमार विष्णोई, रमेश कुमार विष्णोई व मांगीलाल विष्णोई (सर्व मारुंजी ता. मुळशी, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसात संगणमत करून मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोहनलाल यांच्या फर्निचर दुकानात जाऊन दमदाटी केली.

या भागात फक्त आमचाच व्यवसाय चालेल अशी धमकी देत शिवीगाळ केली .त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दगडाने डोक्यात मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलालाही मारहाण करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"