Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पुणे

हिंजवडी आयटी पार्क अंतर्गत रस्त्यासाठी 426 कोटींचा निधी मंजूर!

हिंजवडी आयटी पार्क अंतर्गत रस्त्यासाठी 426 कोटींचा निधी मंजूर!

हाय पावर कमिटीच्या पहिल्या बैठकीत निर्णय
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, मेट्रोशी जोडणी, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर एकात्मिक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी 426 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आणि पीएमआरडीए यांनी याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करावी अशी निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र होळी यांनी दिले आहेत.

gokul astami
gokul astami

आयटी पार्क कर्मचारी हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे .

या बैठकीस आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख, हिंजवडी, माण व मारुंजी गावातील नागरिक उपस्थित होते. हिंजवडीतील वाहतूक प्रश्नावर केवळ रस्ते दुरुस्ती न करता मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, पादचारी, सायकल आणि लास्ट मैल कनेक्टिव्हिटी यांचा समन्वय साधनारी वाहतूक व्यवस्था विकसित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. मेट्रोस्थानकांपासून आयटी कंपन्या, निवासी सोसायटी आणि स्थानिक गावापर्यंत नागरिकांना सुरक्षित व सुलभपणे पोहोचता यावे यासाठी जोड रस्ते आणि विविध वाहतूक सुविधांचे जाळे उभारण्याचा प्रस्ताव आहे.

हिंजवडी परिसरातील मेट्रोस्थानकांशी जोडणीसाठी सुमारे 19.1 किलोमीटर लास्ट माइल कनेक्टिव्हिटी रस्त्यांचा विकास प्रस्तावित आहे. यामध्ये पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 7. 225 किलोमीटर आणि एमआयडीसी क्षेत्रातील सुमारे 11.974 किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. मेट्रोस्थानकाभोवतीच्या त्या रस्त्यांचा विकास करताना केवळ वाहनांची वाहतूक न पाहता पादचारी आणि सायकल स्वरांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. पेट्रोल स्थानकांपासून साधारण पाचशे मीटर ते 1.5 किलोमीटर परिसरातील जोड रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. पक्के फुटपाथ, सायकल ट्रॅक, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था, स्ट्रीट लाईट आणि दिशादर्शक फलक उभारण्याचा प्रस्ताव आहे.

रस्ते विकासामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टार्म वॉटर ड्रेनेज, पाणी व सांडपाणी वाहिन्यांचे योग्य नियोजन, विद्युत व ऑप्टिकल फायबर केबल साठी स्वतंत्र युतीलिटी कॉरिडॉर तसेच गॅस पाईपलाईन साठी आवश्यक जागेचे नियोजन करण्याचा समावेश आहे. हिंजवडी, माण आणि मारुंजी गावातील सहा डीपी रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही देण्यात आले. भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन रस्त्यांचे नियोजन, पादचारी सुविधा, सायकल मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक यांचा एकत्रित विचार करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

हिंजवडी परिसरातील पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मुळशी धरणातील पाणी उपलब्ध करून देण्याबाबत टाटा कंपनी सोबत चर्चा सुरू असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. आयटी पार्क आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. हिंजवडी परिसरातील विविध विकास कामांच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी पुढील आठवड्यात प्रत्यक्ष परिसरात भेट देणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क अंतर्गत रस्त्यासाठी 426 कोटींचा निधी मंजूर हाय पावर कमिटीच्या पहिल्या बैठकीत निर्णय

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"