महिलेशी मैत्री;विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक!

पिंपरी: फेसबुक वरून मैत्री करून एका महिलेचा विश्वास संपादन केला. बहिणीचे लग्नासाठी महिलेकडून रोख रक्कम दागिने व मोबाईल असे 92 हजार रुपये किमतीचे मौल्यवान वस्तू घेतल्या. त्या परत न करता परस्पर अपहार केला. ही घटना 13 डिसेंबर 2025 रोजी पवार बिल्डिंग, दवणे वस्ती, आंबेठाण, ता. खेड येथे घडली.
याबाबत एका महिलेने 22 जानेवारी रोजी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बबलू रवींद्र कुशवाह (रा. रामबाग ता. कप्तानगंज, जि. कृषीनगर, उत्तर प्रदेश )असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीबरोबर फेसबुकवर मैत्री करून फिर्यादीवर प्रेम केले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपीच्या बहिणीचे लग्नासाठी फिर्यादी कडून रोख रक्कम दागिने असे 92 हजार रुपये किमतीचे मौल्यवान वस्तू घेऊन फिर्यादीस परत न करता त्याचा अपहर केला. शिवाय फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात केला असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करत आहेत.

तडीपार आदेशाचा भंग; एकास आटक!
पिंपरी : पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण भागातून दोन वर्ष तडीपार केलेल्या गुंडाने कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला. शिवाय कोयत्यासह आरोपी मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार 21 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गाव जत्रा मैदानाजवळ भोसरी येथे घडली.
याबाबत महादेव गुलाब गारोळे पोलीस शिपाई, भोसरी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. रमीज अल्ताफ काझी (वय 25, रा. नूर मोहल्ला, भोसरी) असे अटक तडीपार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमिज काझी यास चार जुलै 2025 रोजी पिंपरी चिंचवड पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. तडीपारीची मुदत संपण्या अगोदरच आरोपीने कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला. शिवाय दोनशे रुपये किमतीचे कोयत्यासह आरोपी मिळून आला .भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार ढेकणे हे पुढील तपास करत आहेत.

