फक्त मुद्द्याचं!

18th May 2026
गुन्हेगारी

म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणूक!

म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किंमतीत देण्याचे आमीष दाखवून फसवणूक!

पिंपरी : डांगे चौक येथील नाईटींन ग्रीन सोसायटीमध्ये म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किंमती देण्याचे आमीष दाखवून 20 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये प्रिया अपार्टमेंट, फ्लॅट नंबर एक ,पीएनजी गाडगीळ समोर चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

कल्पना सतीश पाटील (वय 40, फ्लॅट नंबर दोन, साहिली आपारमेंट, कृष्णा हॉस्पिटल शेजारी कराड )यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. उमाकांत डाके (वय 60, जया उमाकांत डाके (वय 56), शुभम उमाकांत डाके (वय 29) (एक ते तीन आरोपी रा. शेवाळे रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स समोर, जुडसन टाऊन इंग्लिश स्कूल जवळ, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी डांगे चौक येथील नाइटिंग ग्रीन सोसायटी मध्ये म्हाडाचे दोन फ्लॅट कमी किंमतीत देण्याचे अमिष दाखवून त्यांचे कडून 20 लाख 85 हजार रुपये घेऊन त्यांना फ्लॅट दिला नाही. त्यांचे पैसे देखील परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"