Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

7th July 2026
गुन्हेगारी

जॉब देण्याच्या बहाण्याने सहा लाख 87 हजार रुपयांची फसवणूक!

जॉब देण्याच्या बहाण्याने सहा लाख 87 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : चांगला जॉब मिळवून देऊ त्यासाठी रजिस्ट्रेशन करा असे सांगून वेगवेगळ्या कारणाद्वारे 3 जानेवारी 2026 पर्यंत 6 लाख 87 हजार 984 रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना सात एप्रिल 2025 ते 3 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन एफ 907, आयट्रेट होम्स हिंजवडी, फेज टू माण येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी लक्ष्मीकांत सुधाकर अनजनकर (वय 36, आय ट्रेड होम हिंजवडी, फेज नंबर दोन, माण, मुळगाव- फ्लॅट नंबर 58, गणेश कॉलनी, प्रताप नगर, नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आपका वर्क व डोले इंडिया या नावाचे कन्सल्टिंग ई-मेल आयडी अज्ञात व्यक्ती व बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीला मेल आयडी करून सांगितले की, तुम्हाला आमच्या आपका वर्क कन्सल्टिंग व डोले इंडिया यामधून चांगला जॉब मिळवून देऊ. त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल असे सांगून त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून 3 जानेवारी 2026 पर्यंत सहा लाख 87 हजार 984 घेतले.मात्र आरोपींनी जाब बाबत फिर्यादीस जबाब न दिल्यामुळे फिर्यादीने वारंवार मेल व फोन करून सुद्धा आरोपींनी फिर्यादीला जॉब न दिल्यामुळे फिर्यादीची खात्री झाली की मला फसवण्यात आले आहे. जॉब देण्याच्या बहाण्याने फिर्यादी कडून बँक खात्यावर पैसे घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"