Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

20th September 2026
गुन्हेगारी

सोन्यासारखे दिसणारे दागिने देऊन चार लाखाची फसवणूक; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

सोन्यासारखे दिसणारे दागिने देऊन चार लाखाची फसवणूक; अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पिंपरी : सोन्यासारखे दिसणारे दागिने देऊन एका व्यक्तीची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना शनिवार 19 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वासुली फाटा, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी दिलीप भाऊ सावंत (वय 39, करंज विहीरे, पो.शिवे ,ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे मोबाईलवर फोन करून फिर्यादीला वासुली फाटा येथे बोलावले. आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेऊन त्याच्याकडील असलेले सोन्यासारखे दिसणारे दागिने दहा लाख रुपयाला विकायचे आहेत असे सांगितले. फिर्यादी यांनी विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था येथे जाऊन घरातील सहा तोळे सोने तारण ठेवून चार लाख रुपये कॅश आणून ठेवलेली रक्कम फिर्यादीने अज्ञात व्यक्तींना दिली. उर्वरित सहा लाख रुपये सोमवारी देतो असे सांगितले . त्या अज्ञात व्यक्ती व त्यांच्या सोबत असलेल्या महिलेने फिर्यादीला खोटे सोन्यासारखे दिसणारे दागिने देऊन फिर्यादीची फसवणूक केली. उत्तर माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक जावळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"