फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

इंटरनेट बँकिंगचे ॲपमधून सहा लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक!

इंटरनेट बँकिंगचे ॲपमधून सहा लाख नऊ हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : बँक ऑफ महाराष्ट्राचे इंटरनेट बँकिंगचे ॲप (महा मोबाईल प्लस ॲप) ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकला असता त्यावर नवीन पासवर्ड टाकण्याबाबत सांगितल्यावर फिर्यादीने नवीन पासवर्ड टाकल्यावर त्यांच्या बँक खात्यातून विविध बँक खातेदारांच्या नावावर पैसे काढुन घेण्यात आले. एकूण सहा लाख नऊ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून काढून फसवणूक करण्यात आली. ही घटना 7 डिसेंबर 2025 रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहते घरी घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत शुक्रवार 24 जानेवारी रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीराम रावसाहेब गीते (वय 32, रा. फ्लॅट नंबर बी 602, बी बिल्डिंग, अभिलाषा पार्क, परंडवाल ,चौक देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. अनोळखी तीन बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे मोबाईल वरील बँक ऑफ महाराष्ट्राचे इंटरनेट बँकिंग चे ॲप महा मोबाईल प्लस ॲप ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकला असता त्यावर नवीन पासवर्ड टाकण्याबाबत सांगितले. नवीन पासवर्ड टाकल्यावर सदरच्या ॲप मधून फिर्यादीच्या खात्यावरील रक्कम विविध बँक खातेदारांच्या बँकेत काढून घेण्यात आली. सहा लाख नऊ हजार रुपयांची परस्पर ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जानकर हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"