फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
गुन्हेगारी

जादा नफ्याचे आमीष दाखवून 40 लाख 9 164 रुपयांची फसवणूक!

जादा नफ्याचे आमीष दाखवून 40 लाख 9 164 रुपयांची  फसवणूक!

पिंपरी :  ट्रेडिंग व स्टॉक मार्केटमध्ये पैसे भरण्यास सांगून एका व्यक्तीची सुमारे 40 लाख 9 164 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 नोव्हेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत फ्लॅट नंबर 22, कुबेर मार्केट अपार्टमेंट, चिंचवडगाव येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी रत्नाकर कमलाकर  कुलकर्णी (वय 42, रा. फ्लॅट नंबर 22, कुबेर मार्केट अपार्टमेंट, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली माला तोडरवाल, सुरेश शुक्ला व मोबाईल धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी फिर्यादीची 40 लाख 9 164 रुपये इतकी रक्कम आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगून तसेच फिर्यादीचे पैसे बँक खात्यावर वळवून घेण्यात आले. त्या बँक खात्याचे धारक व वापरकर्ते यांनी ट्रेडिंग व स्टॉक मार्केटमध्ये पैसे भरण्यास सांगून जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ग्रुप द्वारे मेसेज करून त्या बदल्यात फिर्यादीस कोणताही परतावा न देता किंवा घेतलेली रक्कम परत न करता 40 लाख 9 हजार 164 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहेत. 

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"