फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

जमीन विकत देण्याचे आमीष दाखवून 32 लाख रुपयांची फसवणूक!

जमीन विकत देण्याचे आमीष दाखवून 32 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी: जमीन विकत देण्याचे आमीष दाखवून एका व्यक्तीकडून 32 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 2021 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत (माण ता. मुळश येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी ओंकार अशोक अष्टेकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिला आरोपीच्या (हिंजवडी ता. मुळशी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीस माण येथील मल्हार पार्क मधील प्लॉट नंबर 12 विकण्याचे कबूल केले होते .त्यासाठी बँक ट्रान्सफर द्वारे चार लाख 53 हजार आणि रोख स्वरूपात 27 लाख 47 हजार रुपये असे 32 लाख रुपये घेतले.

व्यवहाराबाबत साठेखत करून दिले. मात्र व्यवहार पूर्ण न झाल्याने दिलेले 32 लाख रुपये पोस्ट चेक बाउन्स झाले. आरोपीने जमिनीचा ताबा दिला नाही. खरेदखत करून दिले नाही, घेतलेले पैसे परत न देता विश्वासघात केला असे फिर्यादीचे म्हणणे आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"