फक्त मुद्द्याचं!

7th May 2026
गुन्हेगारी

जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाखाची फसवणूक!

जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाखाची फसवणूक!

पिंपरी : हिरा ग्रुपने वार्षीक 36 टक्के परतावा देण्याचे आमीष दाखवून 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र मूळ गुंतवणूक व परतावा न देता फसवणूक केली .ही घटना 22 नोव्हेंबर 2017 ते आज पर्यंत रा. सी/ 206, औदुंबर नेक्स्ट, मोरवाडी, पिंपरी व ए /101, वाघेरे एम्पायर, मोरवाडी, पिंपरी येथे घडली .याबाबत सलीम लाल मोहम्मद हन्नुरे (वय 52, सी- 206, औदुंबर नेक्स्ट मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील हिरा ग्रुप

viara vcc
viara vcc

च्या मालकीण (वय 42, हिरा ग्राउंड, कार्पोरेट हाऊस ,नदीम कॉलनी, टोली चौकी ट्राफिक, हैदराबाद, तेलंगणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे वडील यांनी 2017 मध्ये हिरा ग्रुप मध्ये वार्षिक 36 टक्के परतावा मिळेल या उद्देशाने अनुक्रमे 21 लाख व चार लाख असे एकूण 25 लाख रुपये गुंतवणूक केली. त्यावर आरोपीने अनुक्रमे 70 हजार व 9000 हजार असे एकूण 79 हजार रुपये फिर्यादी व त्यांच्या वडिलांना सुरुवातीला परतावा दिला. मात्र त्यानंतर विविध कारणे सांगून फिर्यादी व त्यांच्या वडिलांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत दिली नाही. आरोपी यांनी अशाच प्रकारे अन्य लोकांची फसवणूक केल्याचे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे आरोपीस ऑक्टोबर 2018 मध्ये यासंदर्भात अटक करण्यात आली. तीन वर्षे आरोपी तुरुंगात होत्या. जामिनावर सुटल्यावर त्यांनी पुणे येथील गुंतवणूकदार यांची येरवडा येथे बैठक घेऊन सर्व गुंतवणूकदारांचे पैसे कंपनी परत करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले नाहीत. परंतु त्यानंतरही फिर्यादी यांना गुंतवणूक केलेली रक्कम आज पर्यंत दिली नसल्याने तक्रार दाखल केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गाडेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"