फक्त मुद्द्याचं!

14th May 2026
गुन्हेगारी

पुणे महापालिकेत नोकरी लावतो असे आमीष दाखवून 16 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक!

पुणे महापालिकेत नोकरी लावतो असे आमीष दाखवून 16 लाख 18 हजार रुपयांची फसवणूक!

आयुक्तांचे प्रशासकीय सचिव असल्याचे सांगून घातला गंडा
पिंपरी : पुणे महापालिकेच्या आयुक्तांचे सचिव असल्याचे सांगून पुणे महापालिकेतअनुकंपा तत्वाच्या नोकरीच्या सहा जागा असून या ठिकाणी नोकरी लावतो असे आमीष दाखवून 16 लाख 18 हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना सात सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2024 या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयात घडली.

viara vcc
viara vcc

या याप्रकरणी किरण कृष्णात ठोंबरे (वय 44, रा. प्रेमदीप बिल्डिंग, सर्वे नंबर 187 ,बी उद्यम नगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आशिष अशोक उबाळे (वय अंदाजे 38, रा. गणेश गार्डन जवळ, व्हिनीयाल चर्चच्या बाजूला, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिर्यादी यांच्या ओळखीचे होते. त्यांनी फिर्यादींना भेटून सांगितले की, मी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा प्रशासकीय सचिव आहे. पुणे महापालिका येथे अनुकंपा तत्त्वावर नोकरीच्या सहा जागा आहेत. तुमच्या जवळच्या लोकांचे कल्याण होईल असे सांगून फिर्यादी व फिर्यादी यांचे नातेवाईक यांना नोकरी लावतो असे आमीष दाखवले आणि सहा जणांकडून 16 लाख 18 हजार पाचशे रुपये घेऊन फसवणूक केली. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आटवे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"