फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

परदेश सहलीच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक!

परदेश सहलीच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक!

पिंपरी :परदेशात सहलीला जाण्यासाठी १० लाख ८८ हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन महिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे घडली.

viarasmall
viarasmall

दीपक साहेबराव वाघ (वय ४१, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युनिव्हर्स पेसेज वेफेरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन महिला संचालक आणि तेथील अकाऊटंट संदीप पोपट अनर्थे (रा. पाचपाखाडी, ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मार्च ते २३ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. फिर्यादी वाघ यांनी बाली, इंडोनेशिया येथे जाण्यासाठी युनिव्हर्स पेसेज वेफेरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ट्रॅव्हल्स कंपनीकडे वेळोवळी १० लाख ८८ हजार ९०० रुपये भरले. मात्र, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांचा व्हिसा, तिकिटे व हॉटेलचे बुकींग न करता फसवणूक केली. फौजदार मणेर तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"