फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेचार लाखाची फसवणूक!

गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेचार लाखाची फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमीष दाखवून त्या पोटी रक्कम घेऊन एका व्यक्तीची चार लाख सहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एकोणीस ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत भोसरी येथे घडली.

viara vcc
viara vcc

सिटीफंड फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक बाळू डोळस आणि मंगेश बाळू डोळस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी लक्ष्मण सोनबा बोगे (वय 45 ,रा. चर्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजोग आणि मंगेश हे सिटीफंड फिनसर्ह नावाने कंपनी चालवतात. दरम्यान ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल असे सांगून नागरिकांना गुंतवणूक करण्यात सांगतात .फिर्यादी लक्ष्मण यांच्याकडून आरोपींनी दोन लाख रुपये गुंतवणूक घेतली .त्यांना शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यानंतर लक्ष्मण यांना एकूण चार लाख सहा हजार आठशे रुपये परतावा देतो असे सांगण्यात आले मात्र त्यांना नफा अथवा गुंतवणुकीची रक्कम न देता त्यांची फसवणूक केली.

गांजा बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीला केली अटक!
पिंपरी : बेकायदेशीरपणे अमली पदार्थ गांजा बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे .ही कारवाई नऊ डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चऱ्होली येथील डी. वाय. पाटील कॉलेजच्या मोकळ्या परिसरात करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीकडून 25 हजार पाचशे रुपये किमतीचा 511 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे .

याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन लवटे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .शुब्रत सुधीर मंडल (वय 53, रा.चऱ्होली, मूळ रा .पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे .त्याने हा गांजा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"