Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

घरफोडीसह चार गुन्हे उघड ; पाच जण जेरबंद!

घरफोडीसह चार गुन्हे उघड ; पाच जण जेरबंद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर गुन्हे शाखा युनिट (4) गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना संशयितरित्या आढळलेल्या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला. त्यांच्याकडून 1लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय घरफोडीचे दोन गुन्हे उघड केले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

संशयित आरोपी मध्ये ऋषिकेश राजेंद्र भोसले (वय 25, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव), अशोक राजेंद्र भोसले (वय 25, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव व अन्य तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून  डीलक्स मोटरसायकल नंबर (एमएच 13/ सीए/ ८६२८) व (एमएच 14/ बीडब्ल्यू /39 27) अशा दोन मोटरसायकली जप्त करून सखोल तपास केला. त्यांनी चिखली पोलीस ठाणे हद्दीत दोन घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे . उत्तर चाकण पोलीस ठाणे, उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे उघड झाले आहेत. आरोपी क्रमांक एक व इतर दोन यांना पुढील कारवाईकामी उत्तर चाकण पोलीस येथे हजर केले आहे. तसेच आरोपी क्रमांक दोन व इतर एक यांना पुढील कारवाईसाठी उत्तर महाळुंगे येथे वैद्यकीय तपासणी करून हजर केले आहे.

indra dairy
indra dairy

ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (एक) डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट (चार) अर्जुन घोडे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार लोणकर, पोलीस हवालदार मोरे, महाडिक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"