लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ओम प्रकाश पेठे यांचे निधन!

पिंपरी : लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल ओम प्रकाश पंढरीनाथ पेठे (वय ५७) यांचे वाल्हेकरवाडी येथे शुक्रवारी (दि ७) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

ओमप्रकाश पेठे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील थेरगाव येथील असून सध्या चिंचवड येथील वाल्हेकरवाडीत वास्तव्यास होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कंपनी कामगार ते यशस्वी उद्योजक अशी वाटचाल केली. शून्यातून विश्व निर्माण केले. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रीय यल्लम संस्था आळंदी या संस्थेचे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर लातूर जिल्हा मित्र मंडळाचे सल्लागार,
चिंचवड येथील चिंतामणी मित्र मंडळाचे सल्लागार
एक्सपोनेन्शन उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. तरूणाचे स्किल वाढविण्यासाठी कौशल्य विकास उपक्रम सुरु केला होता. एक्सपोनेन्शन ग्रुपचे संस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले.
लायन्स क्लबच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख, उप प्रांतपाल, प्रांतपाल म्हणून काम केले. लातूर सारख्या ग्रामीण भागात जलसिंचन योजना राबविल्या. शहरांमध्ये रक्तदान शिबीर, गोरगरिबांना मदत, शिक्षक पुरस्कार असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतला. लोकमान्य रुग्णालयात डायलिलीस यंत्रणा वैद्यकीय साहित्यवाटप केले. तसेच देश विदेशातील उद्योगविषयक संमेलनात सहभाग घेतला. प्रतिनिधीत्व केले.
लायन्स क्लबच्या महिला विंगच्या माजी अध्यक्षा श्रद्धा पेठे यांचे ते पती, सीए श्रावणी, युवा स्वराज यांचे ते वडील होत.

