सारिका आणि संतोष लांडगे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
भोसरी, प्रतिनिधी : भोसरीतील माजी नगरसेविका सारिका लांडगे व संतोष लांडगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या पदयात्रा, रॅली, भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. नखाते यांनी राजीनाम्याचे पत्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून भाजपला रामराम ठोकला आहे.

