भाजपाचे माजी नगरसेवक मामनचंद अगरवाल यांचे निधन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मामनचंद छोटूराम अगरवाल यांचे वृद्धिपकाळाने दुःखद निधन झाले आहे.
मामनचंद छोटूराम अगरवाल हे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष होते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे आज (दि.७) वृद्धापकाळाने दु;खद निधन झाले आहे. अंत्यदर्शन आज सायंकाळी ५ वाजता राहत्या घरी निगडी प्राधिकरण येथे आहे. सदगुरु जंगली महाराज बॅंकेचे ते अध्यक्ष होते. लहानपणापासून त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. अंत्यविधी आज दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता अमरधाम स्मशानभूमी निगडी येथे होणार आहे.