पोलीस आयुक्तालय कार्यालयातील पाच पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त!

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयातील पाच पोलीस अधिकारी व एक अंमलदार हे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते सत्कार व निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ या ठिकाणी करण्यात आला.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले टीपसिंग भारत सिंग राजपूत (सहाय्यक पोलीस आयुक्त, बिनतारी संदेश), अशोक नागू गांगड (पोलीस उपनिरीक्षक, चाकण पोलीस स्टेशन), दिनकर काशिनाथ गावडे (पोलीस उपनिरीक्षक, ज्येष्ठ नागरिक कक्ष), अरुण भाऊसाहेब तावरे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग ),शरद ज्ञानेश्वर पोटे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय) व वसंत बाजीराव पवार (पोलीस हवालदार, विशेष शाखा एक) 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त निमित्त सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग, डॉ. बसवरावजी तेली, पोलीस उपायुक्त मुख्यालय, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सेवानिवृत्त झालेले पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबीयांसह शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ ,सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, झाडाचे रोपटे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

