बँक अकाउंट वरील 6 लाख 87 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक!

पिंपरी : मित्राला पाठवलेले ऑनलाइन पैसे नजरचुकीने दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले, ते पैसे परत घेण्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला असता आरोपींनी फिर्यादी यांना आम्ही बँकेतून बोलत असल्याचे भासवून फिर्यादीच्या बँकेची माहिती घेऊन व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे मोबाईल हॅक करून बँक अकाउंट वरील 6 लाख 87 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 9 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 या दरम्यान घडली.

याबाबत एका महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजीव गुप्ता, बंधन बँक अकाउंट धारक, कॅनरा बँक अकाउंट धारक, आयडीबीआय बँक अकाउंट धारक, एन एस डी एल बँक अकाउंट धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी तिच्या मित्राला ऑनलाइन बँकिंग द्वारे पैसे पाठवले. मात्र नजरचुकीने ते पैसे चुकीच्या दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले .ते पैसे परत घेण्यासाठी फिर्यादीने बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला. आरोपींनी फिर्यादी यांना आम्ही बँकेतून बोलत असल्याचे भासवून त्यांची इतर बँकेची माहिती घेऊन व्हाट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे मोबाईल हॅक करून त्यावर ओटीपी पाठवून तो ओटीपी देण्यास भाग पाडले आणि फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक हे दोन्ही बँक खाते हॅक करून त्यामधील पैसे काढून ते त्यांचे पैसे परत मिळतील असे आमीष दाखवले. फिर्यादीच्या व्हाट्सअप मोबाईल वर व्हिडिओ कॉल करून त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्याकडून घेतलेली रक्कम परत न देता त्यांची 6 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली .याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे रणजीत जाधव हे तपास करत आहेत.

