फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

अखेर सुलभा उबाळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

अखेर सुलभा उबाळे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

विकास कामांचे कारण; निष्ठा गेली ……
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सुलभा उबाळे यांच्यासोबत भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाता काटे, शिवसेना संघटक संतोष सौंदाणकर व युवासेनेचे भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सुलभा उबाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघ पक्षाने सोडून दिल्यामुळे शहरात ठाकरे गटाचे अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही. पक्षनेतृत्व शहराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे काम करण्यास थोडी सुद्धा संधी शिल्लक नाही. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुलभा उबाळे यांनी म्हटल आहे. सुलभा उबाळे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे.

पक्षप्रवेश यावेळी सुलभा उबाळे यांच्यासह उपशहर संघटिका शशिकला उभे, विभाग संघटिका भारती चकवे, शाखाप्रमुख कावेरी परदेशी, उपशाखाप्रमुख निर्मला पाटील, प्रिया जपे, नयना पारखे, उपशाखा संघटिका लीलावती देवकाते, दिपा जागते, गटप्रमुख स्मिता मोगरे, लीना नेहते, मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. तर उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपविभागप्रमुख गणेश झिळे, विभाग संघटक राजेंद्र पालांडे, उपविभागप्रमुख कौस्तुभ गोळे, शाखाप्रमुख महेश डोके, विजय घुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील याप्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, आमदार प्रा.मनीषा कायंदे, शिवसेना सचिव वैभव थोरात तसेच पिंपरी चिंचवड शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"