पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना आज ( 6 ऑक्टोबर) रोजी जाहीर करण्यात आली. 128 नगरसेवकांसाठीच्या 32 प्रभागांच्या प्रारूप रचनेत 314 हरकतीं आल्या असुन निवडणूक आयोगाने हरकतीचा विचार करून काही ठिकाणी बदल केले आहेत.. यामुळे इच्छूकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे..

हद्दी बाबत :-
1) पूर्णतः मान्य :-2 , 2) अंशतः मान्य -3 ,3) इतर सर्व अमान्य
हद्दी बाबत :-
1) पूर्णतः मान्य :-(2 )हरकतीप्रमाणे हद्दीत अंशतः बदल झालेले प्रभाग :-1 व 12 आणि 6 व 7
2) अंशतः मान्य -(3) हरकतीप्रमाणे हद्दीत अंशतः बदल झालेले :-प्रभाग 24 व 25
3) इतर सर्व अमान्य.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहे. २०१७ नंतर आठ वर्षांनी निवडणूक होणार आहे.महापालिका १२ मार्च २०२२ पासून बरखास्त आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून १३ मार्च २०२२ पासून महापालिकेचे कामकाज पाहत आहेत. शहराची सन २०११ ची जनगणना विचार घेऊन प्रभागातील मतदार संख्या निश्चित केली आहे. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेतला आहे.
महापालिकेच्या 128 नगरसेवकांसाठीच्या 32 प्रभागाच्या प्रारूप रचनेवर 314 हरकती, सूचना आल्या होत्या.

