शेतकऱ्यांना विनाअट प्रत्येकी 50 हजार, संपूर्ण कर्जमाफी द्यावी : मारुती भापकर

पिंपरी:महाराष्ट्र सरकारने गतवर्षी केलेली जाहिरातबाजी यावर्षी संपूर्ण बंद करून या जाहिरातीची संपूर्ण रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च होणे व शेतकऱ्यांना विनाअट प्रत्येकी 50 हजार रु.देणे,तसेच शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी सामाजीक कोर्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

छत्रपती संभाजी नगर, धाराशिव सोलापूर, अहिल्यानगर,कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यासह महाराष्ट्रात यावर्षी पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यभरातील सुमारे 65 लाख हेक्टर वरील पिके अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत. एनडीआरएफचे निकष बदलुन त्याच्यापुढे जाऊन त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी सुमारे रु.30000 चे नुकसान झाले आहे . शासनाने याची दखल घेऊन लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी कोणतेही निकष न पाहता प्रत्येकी पंधरासे रुपये खात्यावर जमा केली,त्याप्रमाणे आता या लाडक्या शेतकरी भावांना कोणतेही निकष न लावता तातडीने प्रत्येकी 50 हजार रुपये खात्यावर जमा करावेत.
यावर्षी अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, कोल्हापूर,सातारा,सांगली,पुणे,कोकण यासह संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक करणारा पाऊस पडला आहे. यामध्ये मका, कापूस,सोयाबीन बाजरी मूग फळबागा प्रचंड नुकसान झाले आहे. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या पशुधनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरादारातील सगळ्या वस्तू खराब झाल्या आहेत. लहान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे. शेतातील उभी पिके नष्ट झाले असून, शेतातील माती खरडून वाहून गेली आहे, विहरी बुजल्या गेल्या आहेत.मायबाप सरकार कडुन यावर तातडीने कुठलेही उपाय होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी व तोंडाला पाणी पुसणरी आहे.
महाराष्ट्र शासनाने आज पर्यंत वर्षभरात केलेल्या जाहिरातीसाठी,वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी चार पाचशे कोटी रुपये खर्च शासनकरते ,शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च होतात, देवा भाऊ नावाच्या जाहिरातीवर कोट्यावधी खर्च केला जातो. अशा सर्वच सरकारी जाहिराती पुढील वर्षात संपूर्ण बंद करून या जाहिरातीचे रक्कम पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च व्हावेत. तसेच पीएम केअर फंडाची रक्कम व इतर महाराष्ट्र सरकार व केंद्राची मदत घेऊन शेतकऱ्याच्या कुटुंबांना 50 हजार रुपयाची तातडीची मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी असे आवाहन यांनी केले आहे.

