फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
पिंपरी-चिंचवड

फायद्याचे आमीष दाखवून शेतकऱ्याची 66 लाखाची फसवणूक!

फायद्याचे आमीष दाखवून शेतकऱ्याची 66 लाखाची फसवणूक!

पिंपरी: इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि रियल इस्टेट व्यवसायातून मोठ्या फायद्याचे अमिष दाखवून एका शेतकऱ्याची 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. घटना सप्टेंबर 2020 ते 2 जुलै 2022 या कालावधीत हिंजवडी, औंध , बाणेर परिसरात घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी मारुती बबन सावंत (वय 40, रा. भोईरवाडी माण, मुळशी यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत गणेश प्रकाश बारणे (थेरगाव, पिंपरी), ज्ञानेश अनिल शिंदे (पाषाण, पुणे) आणि भरत परशुराम बानखेले (मंचर, आंबेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडे पैसे नसतानाही त्यांच्या जमिनीवर बँकेचे कर्ज काढण्यास लावले आणि ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. कोणताही व्यवसाय न करता किंवा मूळ भांडवल परत न देता आरोपींनी फसवणूक केली आणि पैशाची मागणी केल्यावर फिर्यादीला धमकी दिली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

महागडा कॅमेरा आणि इतर साहित्य मुदतीनंतरही परत न करता फसवणूक
पिंपरी : भाड्याने घेतलेला महागडा कॅमेरा आणि इतर साहित्य मुदतीनंतरही परत न करता स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना एक ते नऊ जानेवारी 2026 दरम्यान हिंजवडी येथील गेरा आवारा रोड परिसरात घडली आहे .याप्रकरणी ओमकार महेश जंगम (वय 27, सेंटर स्ट्रीट, पुणे कॅम्प) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अंकित सुरज राणे (रा. गेरा आवारा फेस तीन रोड, हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोनी कंपनीचा कॅमेरा आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल भाड्याने घेतला होता. मात्र भाड्याची मुदत संपल्यानंतरही त्याने साहित्य परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"