फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
महाराष्ट्र

पुण्यातील रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक!

पुण्यातील रेव्ह पार्टीतून एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक!

पुणे : पुणे खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या पार्टीवर धाड टाकून पाच जणांना अटक केली. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा यामध्ये समावेश आहे. प्रांजल खेवलकर हे महिला राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती आहेत.

viara vcc
viara vcc

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली बेकायदा रेव्ह पार्टी सुरू होती .फ्लॅटमध्ये अमली पदार्थ दारू आणि हक्काचे सेवन सुरू होते . या पार्टीत प्रांजल खेवलकर सह एकूण दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण सहभागी झाले होते . पार्टीतून अमली पदार्थ दारू हुक्का यांची जप्त करण्यात आले. तसेच पार्टीत सहभागी झालेल्या प्रांजल केवलकर सह पाच जणांना अटक करण्यात आली . अटक केलेल्यांना ससून रुग्णालयात तपासणीसाठी घेण्यात आले आहे .

प्रांजल खेवलकर यांची ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना हडपसर येथील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले. या ठिकाणी पोलिसांना अमली पदार्थाचा साठा आहे का याची चौकशी केली .या बंगल्यातून पोलिसांनी काही गोष्टी ताब्यात घेतल्याची माहिती आहे . या प्रकारामुळे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपचे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत .सिडी बाहेर काढण्याची भाषा सुरू होती . या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई पकडला जाणे हा निव्वळ योगायोग आहे की, यामागे राजकीय कनेक्शन आहे याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महायुतीच्या विरोधात आवाज उठविणार्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची पध्दत सध्या भाजपाने सुरु केली आहे असा आरोप राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार गटाने केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"