पीएमआरडीएच्या व्यापारी गाळयासाठी ई -लिलाव

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील पेठ क्र. १२ भोसरीमधील गृहयोजना क्र. १ व २ मधील १ व्यापारी दुकान (गाळा) आणि पेठ क्र. ४ (मोशी) बोराडेवाडीतील दुकान क्र. ६ चा ई-लिलाव करण्यात येत आहे. सदर दुकान अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

या २ दुकानांच्या ई-लिलावासाठी इच्छुक नागरिकांकडून दि.२३.०५.२०२५ पासून दि.१२.०६.२०२५ रोजी सायंकाळी ५ पर्यंत Online अर्ज मागवण्यात येत आहे. Online अर्ज भरण्यास https://eauction.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. यासाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्र. महानगर आयुक्त दीपक सिंगला (भा.प्र.से.) यांनी केले आहेत.