आम्ही आमचे प्रश्न चर्चेतून सोडवू

भारताने नाकारला अमेरिकेचा कोणता प्रस्ताव?
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत – अमेरिका यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशातील व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने तसेच अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याने भारत-अमेरिकेची मैत्री अधिक दृढ झाली आहे. संरक्षण, ऊर्जा, व्यापार, एआय आणि अप्रवासी भारतीयांच्या मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा झाली. याचवेळी पाकिस्तानने टर्कीसोबत मिळून द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा करार केला आहे. मुळात टर्की या देशाने मागच्या काही वर्षात भारतविरोधी भूमिका घेत पाकिस्तानला साथ दिली आहे. काश्मीर मुद्यावर टर्कीने नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोर ठेवलेल्या एका प्रस्तावाला भारताकडून नकार देण्यात आला आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात भात – चीन सीमावादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. याबद्दल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, भारताचा दृष्टिकोन याबाबतीत द्विपक्षीय राहिला आहे. ट्रम्प यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत प्रस्ताव ठेवला की, भारत – चीन सीमेवर सतत चकमकी झालेल्या दिसतात. हे कायम असेच चालत राहील. हे थांबविण्यासाठी मी काही मदत करू शकलो तर मला आनंद वाटेल.
मात्र, आमचे कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत जे काही मुद्दे असतील ते आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी यावेळी सांगितले.