डॉ, विश्वास मोरे यांच्या “पावले तुकोबांची” या ग्रंथास प्रथम क्रमांक!

मातृ मंदिर विश्वस्त संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार
पिंपरी : मातृ मंदिर विश्वस्त संस्था निगडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.जगतगुरू प्रकाशनच्या डॉक्टर कल्पना काशीद आणि लेखक लेखक डॉक्टर विश्वास मोरे यांच्या “पावले तुकोबांची” या ग्रंथास प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे .त्याचबरोबर संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉक्टर के .वा .आपटे यांच्या ‘षष्ठ पंचशीलका’ या ग्रंथास प्रथम क्रमांक मिळाला आहे अशी माहिती संस्थेचे कार्यवाहक मनोज देवळेकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे .

मातृ मंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून संत साहित्य विषयक लेखन ग्रंथासाठी पुरस्कार दिले जात आहेत .लेखक आणि प्रकाशक यांना विभागून पुरस्कार देण्यात येतो. समीक्षक राधा गोडबोले आणि डॉक्टर रंजनाताई पत्की यांनी परीक्षण केले आहे. दोन गटाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत .त्यामध्ये चिंतनपर आणि विवेचनपर पुस्तकाच्या गटामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विश्वास मोरे यांच्या” पावले तुकोबांची” ग्रंथास प्रथम क्रमांक आणि रोहन उपळेकर यांच्या” विदारुनी महास्तंभ देव प्रकट स्वयंम” या ग्रंथात द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक डॉक्टर के .वा. आपटे यांच्या “आद्य शंकराचार्य कृत सर्व वेदांत सिद्धांत सार” श्री संग्रह ” या आणि डॉक्टर नारायण रघुनाथ देशपांडे यांच्या” पूर्ण कळा” ग्रंथास तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. विशेष पुरस्कार डॉक्टर श्यामा घोणशे यांच्या” क्रांत दर्शी महात्मा बसवेश्वर या ग्रंथ तसेच विश्वनाथ छत्रे यांच्या ” गणेशोत्सव गीतसार” या ग्रंथास विभागून बक्षीस देण्यात आले आहे .ललित साहित्य पुरस्कार संत जीवन आणि ललित साहित्य गटात डॉक्टर के .वा .आपटे यांच्या” षष्ठ पंचशील” या ग्रंथास प्रथम क्रमांक आणि डॉक्टर सुनिता सहस्त्रबुद्धे यांच्या ” सार्थ श्रीराम गीता” या ग्रंथास द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे .
पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय मनोहर वाढोकार सभागृहामध्ये होणार आहे असे देवळेकर यांनी म्हटले आहे.

