फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू!

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू!

पुणे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालक पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला.

डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड, रत्नागिरी, नंदूरबार, अहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाशिक विभागीय माहिती उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

viara ad
viara ad

प्रभारी उपसंचालक श्रीमती पाटोळे यांनी प्रभारी उपसंचालक म्हणून चांगले काम केल्याचे यावेळी उपसंचालक डॉ. मोघे यांनी नमूद केले. सामुहीक प्रयत्नातून सर्वांनी कार्यालयाचे कामकाज अधिक चांगले होईल असे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती पाटोळे आणि कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ.मोघे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे,प्रदर्शन सहायक विलास कसबे, वरिष्ठ लिपिक सचिन बहुलेकर, वैशाली रांगणेकर, स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, सुवर्णा पालकर, आराध्या लोंढे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"