फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील वाहतूक मार्गात बदल!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील वाहतूक मार्गात बदल!

पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात  अनुयायी येत असतात. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहतूक मार्गात वाहतूक पोलिसांनी बदल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

शनिवार सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी आंबेडकर चौकात अनेक अनुयायी येत असतात .त्यामुळे महामार्ग आणि अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी होते .यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. महावीर चौक चिंचवड कडून आंबेडकर चौक पिंपरी कडे सर्विस रोड ने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे .या मार्गावरील वाहनांनी डी मार्ट इन ग्रेड सेपरेटर मार्गे इच्छित स्थळी जावे. नाशिक फाट्याकडून आंबेडकर चौक पिंपरी कडे सर्विस रोड ने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे .डेरी फार्म ग्रेट सेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेट सेपरेटर इन मार्गे वाहनांनी इच्छुक स्थळे जावे असे सुचवण्यात आले आहे.

स्वर्गीय इंदिरा गांधी पूल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील नागरिकांनी मोरवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. नेहरूनगर चौकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी कडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे .या वाहनांनी येथील कॉर्नर बस स्टॉप येथून मासुळकर कॉलनी मार्गे इच्छित स्थळी जावे. ही प्रवेश बंदी शनिवार सहा डिसेंबर रोजी दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"