मैदानावर भारतीय क्रिकेटपटूंशी मैत्री नको

पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मोईन खान याचा पाक खेळाडूंना सल्ला
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
कराची (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या मैदानावर भारतीय खेळाडूंशी मैत्री करण्याच्या फंदात पडू नका, असा सल्ला पाकिस्तान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक मोईन खान यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना दिला आहे.
येत्या २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणाऱ्या आयसीसी (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्यांची गाठ पडली असता मैदानावर आपल्या भारतीय खेळाडूंशी मैत्री करू नये असे त्याने म्हटले आहे. खेळाडूंनी विरोधी पक्षाचा आदर केला पाहिजे परंतु आपली व्यावसायिक रेषा देखील ओलांडली जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
अलिकडे जेव्हा मी पाकिस्तान आणि भारताचे सामने पाहतो तेव्हा मला ते समजत नाही, कारण भारतीय खेळाडू क्रीजमध्ये येतात तेव्हा आमचे खेळाडू त्यांचे बॅट बघतात, त्यांना थाप देतात, मैत्रीपूर्ण बोलतात सुद्धा.”
भारतासोबत मैदानावर अनेक लढती खेळलेल्या मोईनने सांगितले की, तो विरोधी खेळाडूंचा आदर करण्याच्या विरोधात नाही परंतु त्यांच्याशी अति मैत्रीपूर्ण वागणूक दिल्यास त्याचा आदर गमावू शकतो.
“आमच्या वरिष्ठांनी आम्हाला नेहमी सांगितले की भारताविरुद्ध खेळताना मैदानावर त्यांच्याशी बोलण्याचीही गरज नाही. जेव्हा तुम्ही मैत्रीपूर्ण वागता तेव्हा ते ते दुर्बलतेचे लक्षण म्हणून पाहतात,” असे मोईन खान म्हणाला.
मोईन खान याने एका मुलाखतीत उत्तर देताना सांगितले की, त्याला त्याच्या पिढीतील काही भारतीय खेळाडूंबद्दल खूप आदर आहे, परंतु तो मैदानावर कधीच दाखवला नाही. परंतु, आजकाल भारताविरुद्ध खेळताना आमच्या खेळाडूंचे वागणे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. व्यावसायिक म्हणून मैदानाबाहेरही तुम्हाला काही मर्यादा असाव्या लागतील.”