फक्त मुद्द्याचं!

16th February 2026
पिंपरी-चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मोरे यांची निवड!

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर मोरे यांची निवड!

पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रावहिणी पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

viara vcc
viara vcc

ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे हे पक्ष स्थापनेपासून काम करत असून त्यांनी पक्षाची विविध पदे भूषवली आहेत, तसेच त्यांना गेले ०९ वर्षे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शहर फेरिवाला समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ही सर्व पदे अजितदादांमुळे मिळाली असे त्यांनी यावेळी सांगितले.

शहराध्यक्ष पदावर काम करत असताना, पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारणी राज्यात सर्वात मोठी व कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुनेत्रावहिणी आणि पार्थदादां सोबत भक्कमपणे उभे राहून पक्ष वाढीसाठी अजितदादांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत असे मोरे म्हणाले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"