माडगूळकर नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने “दिपगंध सुरांचा” दिवाळी पहाट कार्यक्रम!

शनिवारी (१८ ऑक्टोबर ) पहाटे ६ वाजता
पिंपरी : भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (१८ ऑक्टोबर ) पहाटे ६ वाजता आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात भव्य स्वरूपात पार पडणार असून, शहरातील नागरिकांसाठी संगीत, नृत्य आणि कला यांचा सुंदर संगम अनुभवण्याची ही एक खास संधी ठरणार आहे.

क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘दिपगंध सुरांचा ….सुरांच्या सुवासात उजळलेली दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये कोमल कृष्णा, राजेश्वरी, विनय देशमुख, गणेश मोरे हे गायक कलाकार गीत गायन करणार आहेत. तर नितीन खंडागळे, सुबोध जैन, दीपक काळे, शाम चंदनशिवे, सागर घोडके ही मंडळी वादन कलाकार म्हणून साथ देणार आहेत. असल्याची माहिती क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.
‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमात नामांकित गायक, वादक आणि नृत्यकलावंतांची रंगतदार सादरीकरणे सादर केली जाणार आहेत. पारंपरिक पोशाख, दिव्यांच्या सजावटीसह आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला मंगल वातावरण लाभणार आहे. सर्वासाठी मोफत असणाऱ्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून पहाटेच्या या संगीतसफरीचा आनंद घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

