दिवेकर क्रिकेट अकॅडमी ६७ धावांनी विजयी !

पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन तर्फे १९ वर्षाखालील मुलींच्या टी-२५ क्रिकेट
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशन तर्फे १९ वर्षाखालील मुलींच्या टी-२५ क्रिकेट ” पिंपरी-चिंचवड क्रिकेट करंडक ” स्पर्धेला आज दिनांक २१ एप्रिल २०२५, फोर स्टार क्रिकेट क्रीडांगण,हिंजवडी येथे दिवेकर क्रिकेट अकादमी व क्रिकेट बेसिक क्रिकेट अकादमी यांच्या सामन्याने सुरू झाली. या स्पर्धेचे उद्घाटन देवयानी भोसले (डायरेक्टर एस एन बीपी ग्रुप) यांनी केले.
या वेळेस त्या म्हणाल्या की खेळ प्रत्येक खेळाडूंची अंगी खिलाडू वृत्ती बनवितो.यामुळे आयुष्यात खेळाचे महत्व अधोरेखित होते तर संघटनेचे उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे म्हणाले की या स्पर्धेने पिंपरी चिंचवड मध्ये या स्पर्धेमुळे मुलींच्या क्रिकेट खेळाचा पाया रचला जाईल.याप्रसंगी प्रास्ताविक मृदुला महाजन यांनी ,सूत्रसंचालन संजय शिंदे व प्रदिप वाघ यांनी आभार प्रदर्शन केले.या वेळी पिंपरी- चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल,खजिनदार संजय शिंदे ,सहसचिव दिलीपसिंह मोहिते,नरेंद्र कदम,मुकेश गुजराथी,हर्ष नायर तसेच फोर स्टार क्रिकेट क्रीडांगणचे डायरेक्टर विकास डांगे,अविनाश बारणे हेही उपस्थित होते.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचे निकाल खालील प्रमाणे
दिवेकर क्रिकेट अकॅडमी विरुद्ध क्रिक बेसिक क्रिकेट अकॅडमी यांत झालेल्या सामन्यांमध्ये दिवेकर क्रिकेट अकॅडमी ६७ धावांनी विजयी झाली.
दिवेकर क्रिकेट अकॅडमी :-१९१ धावा ३ बळी २५ षटके:- यशस्वी वाघमारे २४, स्नेहल ताम्हाणे ३३, तन्वी पाटील ३८, रुही सिंग १८, साक्षी बोंबले ३१/२.
क्रिक बेसिक्स क्रिकेट अकॅडमी:- १२४ धावा ५ बळी २५ षटके :-
लावण्या देशवंडीकर २१,प्रज्ञा खंडाळीकर १९, श्रेया जगदाळे १०,तन्वी पाटील १०/२, तन्वी खळदकर २१/१,सिद्धी लोणकर ११/१ यशस्वी वाघमारे ९/१.
या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच पारितोषक तन्वी पाटील ( दिवेकर क्रिकेट अकादमी )हिने जिंकले.