फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

डीबीटी मार्फत पालिकेच्या शाळांमधील ५७ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप!

डीबीटी मार्फत पालिकेच्या शाळांमधील ५७ हजार विद्यार्थ्यांना साहित्य वाटप!

पिंपरी : महापालिकेने राबवलेल्या थेट लाभ हस्तांतरण उपक्रमाद्वारे शाळांमधील ५७ हजार ५६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. यामध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ४२ हजार ७७० तर तिसऱ्या टप्प्यात १४ हजार ७९० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या शिक्षण विभागाने डिजिटल ई-रूपी पेमेंट प्रक्रिया राबविली आहे. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, डीबीटी हा विश्वासार्हतेचा नवा मापदंड ठरला आहे. महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी समानतेने लाभ घेत आहे, हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. वेळेत आणि दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेला भक्कम आधार देणारे पाऊल ठरले आहे.’

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, ‘ई-रूपी पेमेंट प्रक्रियेमुळे वितरण कार्य केवळ वेगवानच झाले नाही, तर पालकांमध्येही विश्वास वाढला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी थेट पोहोचल्यामुळे महापालिकेच्या सेवांबाबत पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.

सहायक आयुक्त किरणकुमार मोरे म्हणाले, डीबीटी योजनेमुळे मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळाले, त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अडथळ्याविना झाली. बालवाडीतल्या चिमुकल्यांपासून ते माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना दिलेले दर्जेदार साहित्य हे त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारे ठरले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"