फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर!

देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदेंचं कोल्ड वॉर!

विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधल्या नाराजीची चर्चा रंगलेली असतानाच, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये नाराजीचा नवा अंक सुरु होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पण सुरक्षेत कपात झाल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आलीय.. ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, त्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत काय काय घडलं?, जाणून घ्या…
18 जानेवारी- शिंदेंच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती
6 फेब्रुवारी- मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती
7 फेब्रुवारी- ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा गणेश नाईकांचं वक्तव्य
9 फेब्रुवारी- आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळले, चर्चा रंगताच नियम बदलून शिंदेंची नियुक्ती
10 फेब्रुवारी- अधिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा उदय सामंतांचा आरोप
14 फेब्रुवारी-‘दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका’ असे शिंदेंचे उद्गार, वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असं भाजपचं स्पष्टीकरण
16 फेब्रुवारी- मुख्यमंत्र्याच्या कक्ष असताना शिंदेंकडून उपमुख्यमंत्री ‘वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ची घोषणा
17 फेब्रुवारी- मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढली

विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा आहे.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित झाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या चर्चेवर मौन सोडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतरपणे राज्याचा कारभार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे.महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्ड वॉर नाही तर…
तसेच राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम उघडली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे असा खोचक टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"