फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘देवेंद्र 3.0’ पर्वाला सुरुवात!

महाराष्ट्रात ‘देवेंद्र 3.0’ पर्वाला सुरुवात!

एकनाथ शिंदे, अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर तब्बल १३ दिवसांनी आज महायुती सरकारचा आझाद मैदानावर ‘महा’शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यास उद्योजक, राजकीय, मनोरंजन या क्षेत्रासह आदी क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच भाजपशासित राज्याचे २२ मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला हजर होते.

यावेळी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. तर शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पहिल्या रांगेत अंबानी कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे निलम गोऱ्हे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक यांच्यासह आदींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर दुसऱ्या रांगेत मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर यांच्यासह आदींची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना त्यांच्या आईने औक्षण करून टिळक लावला अन् आशीर्वाद दिले. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेच पदभार स्वीकारणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दालनात येतील. या दालनात त्यांच्या स्वागतासाठी फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री पद भुषविल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होणे शिंदेंना पटले नसावे, परंतू आता त्यांनी उपमुख्यंत्री शपथ घेतली आहे, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकारबाहेर राहून काम करण्याच्या मताचे होते सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेण्यास तयार झाले. दरम्यान, गृहमंत्रीपदाबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. गृहमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आता त्यांना भाजप हे पद देणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांचा असाही विक्रम; सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अजित पवार बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. अजित पवारांनी पहिल्यांदा १० नोव्हेंबर २०१० मध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.तर गेल्या पाच वर्षात अजित पवारांनी तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.जून २०२३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवारांनी शपथ घेतली. त्यानंतर आज पुन्हा ०५ डिसेंबर २०२४ ला त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"