सप्तसुत्रीचा अवलंब करून ग्राम सहकारातून विकास: पद्मश्री डॉ.पोपटराव पवार

पिंपरी : गावाच्या विकासाचे लक्ष्य साध्य करताना श्रमजीवींचे सहकार्य, घरोघरी शौचालय, भूगर्भातील जलसाठ्यांचे नियोजन, तसेच परिवार नियोजन, नशाबंदी, खुल्या भूमी क्षेत्रावर कृषी पशुधनास चरण्यासाठी करण्यासाठी मनाई व वृक्षतोडीस बंदी इत्यादी सप्तसुत्रीचा अवलंब करून ग्राम सहकारातून हिवरे बाजार हे आदर्श ग्राम म्हणून देशाच्या नकाशावर आणले, असे मनोगत “पद्मश्री डॉ.पोपटराव पवार” यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणाद्वारे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध सामाजिक ग्रामसुधारक पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांनी जलसंधारण व गावाच्या विकासासाठी यशस्वी रित्या राबविलेली सप्तसुत्रीतून हिवरे बाजार यापढ अहिल्यानगर जिल्ह्यातील गावाचा केलेला कायापालट यावर आपले मनोगत व विकासाची वाटचाल विशद केली.
मराठी विज्ञान परिषद व पिंपरी चिंचवड सायन्स पार्क यांच्या संयुक्त प्रयासाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेच्या वाटचालीचा व विविध लोकप्रिय विज्ञान कार्यक्रमांचा आढावा सायन्स पार्कचे संस्थापक संचालक श्री. प्रवीण तुपे यांनी या प्रसंगी घेतला. गेल्या ३० वर्षापासून सतत सरपंच पदी व प्रथम नागरिकाच्या भूमिकेत राहून तळमळ व जिद्दीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त केलेले श्री. पोपटराव पवार हे देशातील पहिले सरपंच आहेत व त्यांच्या कार्याचा उल्लेख मन कीबात या लोकप्रिय कार्यक्रमातून सुद्धा देशाचे “पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी” यांनीही केलेले आहे.

डॉ.पोपटराव पवार पुढे म्हणाले की,गावाचा सर्वांगीण विकास असेल तरच देश शाश्वत विकासाकडे जाऊ शकेल याचे महत्त्व त्यांनी विविध ग्रामविकासाच्या सूत्रातून विशद केले. या व्याख्यानास युवक, महिला, शालेय मुले मुली, साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोतागन उपस्थित होते राजेंद्र सराफ कार्याध्यक्ष पुणे विभाग मराठी विज्ञान परिषद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
व्याख्यानानंतर “सा रे ग मा” या प्रसिद्ध लोकप्रिय कार्यक्रमातील विजेता गायिका सौ. कार्तिकी गायकवाड (पिसे) यांच्या अभंग, लावणी, मराठी चित्रपटातील लोकप्रिय व मंत्रमुग्द्य अशा गीत गायनाचा आस्वाद रसिक व दर्दी प्रेक्षकांनी घेतला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन भोसरी येथील नावाजलेले निवेदक प्राध्यापक दिगंबर ढोकळे सरांनी केले. सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खाम्परीया, शिक्षणाधिकारी कासार, सुनील पोटे आणि कर्मचारी वृंदाने यांनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.