फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

आंद्रा योजनेसाठी प्रकल्प अहवाल करणार

आंद्रा योजनेसाठी प्रकल्प अहवाल करणार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आंद्रा पाणी योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्या सल्लागाराचे एकूण शुल्क सहा कोटी इतके आहे.

मावळ तालुक्यातील आंद्रा धरणातून महापालिकेस शंभर एमएलडी आणि खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आरक्षित आहे. या पाणी आरक्षणास राज्य शासनाने ऑक्टोबर २०१८ ला नव्याने मंजुरी दिली. त्या बदल्यात महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे शुल्क जलसंपदा विभागाकडे भरत आहे. भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी महापालिकेने भूमिगत जलवाहिनी टाकणे, धरणाजवळ जॅकवेल व पंपिंग स्टेशन उभारणे आदी कामे सुरू आहेत. नवलाख उंब्रे येथे ब्रेक प्रेशर टॅकचे काम केले जात आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ४० टक्के काम झाले आहे. वर्षभरात उर्वरित काम करण्याचे नियोजन आहे. जागा ताब्यात येण्यास विलंब होत असल्याने जलवाहिनीच्या कामास अधिक वेळ जात असल्याने अधिकार्‍यांनी सांगितले.

सद्यस्थितीत आंद्रा धरणातून शहराला ९० एमएलडी पाणी मिळत आहे. हे पाणी धरणातून इंद्रायणी नदीत सोडले जाते. महापालिका इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधा-यावरून उचलत आहे. मात्र, भविष्याचा विचार करता थेट आंद्रा धरणातून पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. तेथे पाणी शुद्ध करून आजूबाजूच्या परिसरात पुरविले जाणार आहे.

या आंद्रा पाणी योजनेच्या डीपीआर तयार करण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता हाती घेतले आहे. त्यासाठी चार एजन्सीचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागास प्राप्त झाले होते. त्यापैकी या विभागात अगोदरपासून काम करीत असलेल्या डीआरए कन्सल्टंट लि. या एजन्सीची प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नियुक्त करण्यात आली आहे. एजन्सी डीपीआर तयार करणार आहे. या प्रकल्पासाठी निविदापूर्व आणि निविदा पश्चात काम ते करणार आहेत. कमाचा कालावधी अडीच वर्षे आहे. त्यासाठी पालिका त्या एजन्सीला सहा कोटी शुल्क देणार आहे. सल्लागार नियुक्त करण्यास, त्यासाठीच्या सहा कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"