दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जनता दरबारात हल्ला!

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज सकाळी त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबारात जन सुनावणी घेत असताना हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे . पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे . दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात मुख्यमंत्री गुप्ता यांचा जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली .

त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्याकडे दिले, मात्र हा व्यक्ती अचानक आक्रमक झाला. त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली . त्या व्यक्तीने अनेकदा त्यांच्या कानाखाली मारल्या .त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे . संबंधित व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण कपूर यांनी केले आहे .मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले असून त्यानंतर त्यांना किती जखमा झाले आहेत हे स्पष्ट होईल . हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असे त्यांनी सांगितले .मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे वय अंदाजे 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. हल्ला करणारा व्यक्ती राजेश भाई सकरिया असून तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे.
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा हुंडाबळीची घटना उघडकीस आली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी उच्चशिक्षित दिव्या हर्षल सूर्यवंशी (वय 26) हिचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दिव्याचा पती आयटी अभियंता असून, सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने मृत्यूला कवटाळल्याची चर्चा आहे.