IPL लिलावात ऋषभ पंतने मोडला रेकॉर्ड, ठरला सर्वात महागडा खेळाडू!

२७ कोटी रूपयांना खरेदी
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५साठीचा(IPL) मेगा लिलाव सुरू झाला आहे. हा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये होत आहे. पहिल्या दिवशी सर्वांच्या नजरा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर होत्या. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने जबरदस्त बोली लावत २७ कोटी रूपयांना खरेदी केले. या पद्धतीने पंतने २० मिनिटांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा रेकॉर्ड तोडला.
पंतने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचने नेतृत्व केले होते. त्याला दिल्ली संघाला रिटेन केले नव्हते. अशातच पंत २०१६ नंतर पहिल्यांदा लिलावात उतरला. दरम्यान, पंत दिल्लीने आरटीएम कार्ड नियमाचा वापर केला होता. मात्र अखेरीस लखनऊ संघाने मोठी बोली लावत पंतला खरेदी केले.
RTM कार्डमुळे २७ कोटींचा विकला गेला पंत
खरंतर, ऋषभ पंतची बोली जेव्हा २०.७५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने आरटीएम कार्डचा वापर केला. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने या लिलावासाठी २७ कोटी रूपये केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा पंतसाठी आरटीएम करण्यास रस दाखवला नाही.
पंतसाठी लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये जोरदार बोली लावली. यानंतर सनरायजर्स हैदराबादने एंट्री घेतली. दोघांमध्ये ही बोली २०.७५ कोटीपर्यंत पोहोचली होती.
दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटींना केले खरेदी
टीम इंडियासाठी नवे संकटमोचक आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल आयपीएल २०२५साठी नव्या संघाकडून खेळताना दिसेल. दरम्यान, तो नवा संघ आरसीबी नाही. आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटींना खरेदी केले आहे.
श्रेयस अय्यरलाही मिळाली २६.७५ कोटी रक्कम
कोलकाताला गेल्या वर्षी चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२५च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटी रूपयांची रक्कममध्ये खरेदी केले. आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर श्रेयस अय्यर दुसरा महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या टीमने रिलीज केले होते. श्रेयस अय्यरला केकेआरने रिलीज केले होते. आता अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटींना आणि ऋषभ पंतला लखनऊने २७ कोटींना खरेदी केले.