प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय विभाजित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यावरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर वरून वाढविण्यात आलेली असून आता ३ डिसेंबर २०२५ पर्यत सूचना दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी अ,ब,क,ड,इ,फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले स्मारकातील कक्ष कार्यान्वित आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांनी दिलेल्या मुदतीत हरकती/सूचना दाखल कराव्यात. मुदत संपल्यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सावित्रीबाई फुले स्मारक येथे प्रति पृष्ठ रु. २/- दराने विक्रीस उपलब्ध आहे.
राज्य निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम :
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ३ डिसेंबर २०२५
हरकती/सूचना स्वीकार : ५ ते १० डिसेंबर २०२५
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : १० डिसेंबर २०२५
मतदान केंद्रांची यादी : १५ डिसेंबर २०२५
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : २२ डिसेंबर २०२५

